breaking-newsमनोरंजन

अभिनेता अभिषेक बच्चन यांची कोरोनावर मात

मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन यांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना रु्गणालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनसह त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता चौघेही जण सुखरूप घरी परतले आहेत.

गेल्या महिन्याता अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लगेच अभिषेक बच्चन यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आणि ऐश्वर्या व आराध्यालाहाी कोरोनाची लागण झाली. ऐश्वर्या आणि आराध्याने काहीच दिवसांत कोरोनावर मात केली. तर, नुकतेच बीग बीही कोरोनावर मात करून घरी परतले होते. मात्र, तरीही अभिषेक बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला नव्हता. मात्र, आज त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांनाही नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वचन हे वचन असते. आज दुपारी माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी कोरोनावर मात केली. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले आहे. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सचेही आभार, असे अभिषेक बच्चन याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button