अभिज्ञा भावेचे हटके मंगळसूत्र चर्चेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Capture5678-8.jpg)
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने ६ जानेवारी २०२१ रोजी मुंबईत मेहुल पैशी लग्नगाठ बांधली. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अभिज्ञाच्या साडीमधील लूकची चर्चा होती. त्यानंतर आता अभिज्ञाच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे.
अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. फोटोंमध्ये अभिज्ञाच्या मंगळसूत्रात एम आणि ए ही दोन इंग्रजीमधील अक्षरे दिसत आहेत. एम म्हणजे तिचा पती मेहुल आणि ए म्हणजे अभिज्ञा. या दोन्ही इंग्रजी अक्षरांच्या बाजूला काळे मणी असल्याचे दिसत आहे. चाहत्यांना अभिज्ञाचे हे मंगळसूत्र आवडले आहे.
द
रम्यान, मेहुल पै मुंबईत स्थायिक असून ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु झाली होती. अभिज्ञाने लग्नसोहळ्यासाठी पर्पल-गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली होती. ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.