Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
आज (28 सप्टेंबर) केबीसीचा पहिला भाग प्रदर्शित होणार; कोरोनामुळे शोमध्ये अनेक नविन बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1-13.jpg)
‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला हा शो टीआरपी यादीमध्ये टॉप 10 मध्ये असतो. आज २८ सप्टेंबर रोजी केबीसीचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. मात्र, यंदा करोनामुळे उद्भवलेली जी परिस्थिती आहे त्यानुसार ‘कौन बनेगा करोडपती १२’ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शोच्या क्रिएटीव्ह प्रोड्युसर सुजाता संघमित्र यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहिती नुसार त्यांनी यावेळी शोमध्ये नेमके शोमध्ये कोणते बदल करण्यात आल्याचे सांगितले. तर, जाणून घेऊया शोमध्ये नेमके काय असणार बदल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-86.jpg)
- यंदा कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाहीये. पण हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी IPLमध्ये देण्यात आलेला प्रेक्षकांचा आवाज एपिसोडमध्ये एडीट करताना देण्यात येणार आहे.
- सेटवर प्रेक्षक नसल्यामुळे ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफलाइन काढण्यात आली आहे. त्या जागी आता ‘व्हिडीओ फ्रेंड’ ही जुनी लाइफलाइन पुन्हा स्पर्धकाला खेळताना वापरता येणार आहे.
- ’flip the question’ ही देखील नवी लाइफलाइन देण्यात आली आहे.
- आता स्पर्धकाला ११ ऑप्शन असणार आहेत. त्यामध्ये ‘my city, my state’ ही नवी कॅटेगिरी अॅड करण्यात आली आहे.
- पहिल्या पाच प्रश्नांसाठी स्पर्धकाला ४५ सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या पाच प्रश्नांसाठी ६० सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे.
- व्हिडीओ कॉलवर प्रश्न विचारण्यासाठी देण्यात येणारी वेळ वाढवण्यात आली आहे. आता स्पर्धकाला ४५ सेकंद मिळणार आहेत.
- दर वेळी शोमध्ये फास्टेस्ट फिंगरमध्ये १० स्पर्धक असतात. पण यंदा ८ असणार आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी स्पर्धकांची संख्या कमी करण्यात आली आहे.
- हॉट सीटवर बसणारा स्पर्धक आणि बिग बीं यांच्यामधील अंतर वाढवण्यात आले आहे.
- शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाची निवड केल्यानंतर त्याला मुंबईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याची करोना चाचणी करण्यात येणार आहे.
- घर बसल्या केबीसी पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील SonyLIV या एपद्वारे शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
- दररोज १० प्रेक्षकांना एक लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कार, टीव्हीसेट, मोबाईल फोन अशा अनेक बक्षिसे प्रेक्षकांना जिंकण्याची संधी मिळणार आहे.
- आज २८ सप्टेंबर रोजी केबीसीचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या नविन नियमांसह हा शो पाहण्यासाठी उत्सुकता आहे.