‘अग्गंबाई सासूबाई’ मधली शुभ्रा हलव्याचे दागिने घालून साजरी करणार मकरसंक्रात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-36.png)
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक केला आणि प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं.मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी,या सर्वांमुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.
तेजश्रीची शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. जशास तसं वागणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे.आता मकरसंक्रांतीचा सण येतोय आणि सोहम व शुभ्राची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड पुरवणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5.png)
मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण दणक्यात साजरा करणार आहेत.पहिली संक्रात साजरी करण्यासाठी शुभ्रा हलव्याचे दागिने घालून नटलेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-8.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/6-1.png)
हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय. इतकंच नव्हे तर ते सर्व मिळून पतंग देखील उडवणार आहेत.शुभ्राचा पहिला संक्रांत सण प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.