breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अखेर रेखाचा बंगला कंटेनमेंट झोन मुक्त

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेखा यांच्या घराच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचे घर व शेजारील परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र आता बीएमसीने हा भाग कंटेनमेंट झोन मुक्त केला आहे, त्यानुसार रेखा यांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर सुद्धा हटवण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाला कोरोना होताच रेखा यांना सुद्धा स्वतःच्याच घरात क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगितले होते.

नियमाप्रमाणे त्यांची सुद्धा कोरोना चाचणी होणे अपेक्षित होते मात्र रेखा यांनी या चाचणीसाठी नकार दिला. इतकेच नव्हे तर जेव्हा बीएमसी चे कर्मचारी रेखा यांच्या घराचे सॅनिटायजेशन करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना सुद्धा आत येऊ दिले नाही परिणामी केवळ बाहेरच सॅनिटायझरची फवारणी करून हे कर्मचारी परतले होते

रेखा यांना खबरदारी म्हणून बीएमसी कडून अनेकदा कोरोना चाचणी बाबत सूचना करण्यात आली होती. मात्र त्यांची मॅनेजर फरजाना यांच्या तर्फे रेखा यांनी वारंवार चाचणी करून देण्यास नकारच कळवला होता. आपण कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही त्यामुळे चाचणी करण्याची आवश्यकता नाही असे त्यांची म्हणणे होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button