Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अक्षय कुमारनं 25 कोटींची आर्थिक मदत केल्यानंतर ट्विंकलनं लिहिली एक भावनिक पोस्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-307.png)
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अक्षयनं आपल्या बचतीमधून ही मोठी मदत जाहीर केली आहे. अक्षयनं मदत जाहीर केल्यानंतर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं ट्विटरवर अक्षयसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-58.png)
‘आज त्याच्यामुळे माझी मान अभिमानानं उंचावली आहे. तुला नक्की याची खात्री आहे का हा प्रश्न मी त्याला एवढी मोठी रक्कम जाहीर करण्यापूर्वी विचारला होता. कारण बचत खात्यामधून आम्ही ही रक्कम जाहीर केली. तेव्हा तो आम्हाला एकच म्हणाला मी सुरुवात केली तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं, मात्र आता माझ्याकडे सर्व आहे. अशावेळी ज्या लोकांकडे काहीच नाही त्यांना मदत करण्यासाठी मी स्वत:ला कसं रोखू?’
अशा प्रकारे ट्विंकलनं अक्षयच्या या दिलदारपणाचं पत्नी म्हणून कौतुक केलं.