अंकिता लोखंडे आणि महेश शेट्टीला जज करणं बंद करण्याचं प्रार्थना बेहरेचं आवाहन…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Capture-14.jpg)
सुशांतसिंह राजपूत या जगात नाही यावर अनेकांना अजूनही सर्वांना पचवन कठीण आहे…सर्वांनीच याबाबत हळहळ व्यक्त केली आहे… ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुशांतसोबत काम केलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेही त्याच्या आठवणीत भावुक झाली. सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा देताना तिने अंकिता लोखंडे आणि महेश शेट्टीला जज करणं बंद करण्याचंही आवाहन केलं. दोघांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचं तिने सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. सुशांतच्या निधनावर त्याची एक्स-गर्लफ्रेंड अंकिताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि मित्र महेश शेट्टीने त्याचा शेवटचा फोन उचलला नाही यासाठी लोक दोघांना सोशल मीडियावर सुनावत आहेत. यावर बोलताना प्रार्थना म्हणाली की, ‘मी अंकिताबद्दल सांगू शकते की तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ती प्रचंड रडत आहेत. पण लोकांना कळलं पाहिजे की, प्रत्येकजण आयुष्यात पुढे जात असतं. तिला जेव्हा सुशांतच्या आत्महत्येबद्दल कळलं तेव्हा तिला फार मोठा धक्का बसला. पण तिच्या आयुष्यात दुसरंही कोणी आहे आणि तिला त्या नात्याचाही मान ठेवायचा आहे.’
तसंच प्रार्थना म्हणाली की, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम करताना ती आणि सुशांत एकत्र रिक्षातून प्रवास करायचे. यानंतर त्याने जेव्हा पहिली स्कोडा गाडी विकत घेतली तेव्हा तो सर्वांना घेऊन लाँग ड्राइव्हवर गेला होता. यानंतर त्याने जैग्वार आणि रेन्ज रोवर घेतली तेव्हा प्रार्थनाला एकटीला घेऊन तो ड्राइव्हला गेला होता.
त्याच्या आठवणींना उजाळा देताना तीने त्यांच्या मैत्री बद्दलही सांगितलं…ती म्हणाली की,सुशांत माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक होता. तो मला लहान बहीण मानायचा. कारण ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मी अंकिताची बहीण म्हणून भुमिका साकारली होती. आणि जेव्ह मला सुशांतच्या आत्महत्येबद्दल समजलंं तेव्हा मला काही क्षण कळलंच नाही की नक्की कोणत्या सुशांतबद्दल लोक बोलत आहेत. अशा प्रकारे प्रार्थनालाही सुशांतच जाण हे नक्कीच धक्कादायक होत…तसंच पवित्र रिश्ता मालिकेनंतर दोघं फारसे कधी संपर्कात नसल्याचंही तिने सांगितलं…