breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मला अजितदादांचा फोन पण मी पवारांचा शिलेदार’; एकनाथ खडसेंचा दावा

मुंबई : एकनाथ खडसे हे आमच्याकडे येण्यासाठी आग्रही असून अजित पवारांना बोलले, हे मला माहित आहे. खडसेंनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावं, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, यावरून एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारलं होतं. तसेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता. मला या दोन्ही नेत्यांनी बोलावलं होतं. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नाही.

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस घरं आणि पक्ष फोडण्यात व्यस्त..’; सुप्रिया सुळे यांचा आरोप

मी कधी त्यांच्याकडे आलो हे अजितदादांनी जाहीर करावं. उलट अजितदादांनीच मला विचारणा केली. मिटकरींनी फोन केला. एवढंच कशाला भाजपवालेही मला भाजपमध्ये येण्याचा आग्रह करतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड बोलावलं तरीही मी त्यांच्याकडे गेलो नाही. मी भाजपकडे गेलो नाही तर अजित पवारांकडे कसं जाणार? असं एकनाथ खडसे म्हणाले.

मी सत्तेसाठी कोणाचाही हांजीहांजी करणारा माणूस नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक, मीच संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असलं तर कधीच गेलो असतो, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button