पाटी-पुस्तक
‘आयआयबी’ मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रा. नितीन बानुगडे देणार ‘विजयी भव’चा कानमंत्र
![Prof. Nitin Banugade will give the mantra of victory to students at IIB](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Nitin-Bangude-Patil-780x470.jpg)
पिंपरी | आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीने येथे रविवारी (5 जानेवारी) प्रा. नितीन बानुगडे यांचे ‘विजयी भव’ हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या मोरवाडी येथील आवारात येत्या रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सध्या स्पर्धेचे प्रचंड युग आहे. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अनेक मानसिक त्रासातून पुढे जावे लागते. संघर्षमय परिस्थितीत आपली गुणवत्ता सिद्ध करताना परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रा.नितीन बानगुडे पाटील मार्गदर्शन करतात.त्यांच्या ओघवत्या शैलीने अनेक विद्यार्थी प्रेरित होतात. यातून त्यांना संघर्षातून वाट काढण्याची प्रेरणा मिळेल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.