breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडी

Ganesh Utsav 2023 : शारदा गणेशाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

Sharda Ganesh : गणपतीचे सरस्वती म्हणजेच शारदा आणि लक्ष्मीबरोबरचे चित्र दाखवण्याची परंपरा संपूर्ण सांसारिक सुखाशी निगडित आहे. महाराष्ट्रात याचे सर्वात जुने चित्र हे पन्हाळेकाजी येथील नाथपंथी लेण्यांमध्ये पाहायला मिळते. क्वचित प्रसंगी आधुनिक काळातील मूर्तीमध्ये रिद्धीच्या जागी सरस्वती म्हणजेच शारदेच्या आणि रिद्धीच्या जागी लक्ष्मीला चित्रात दाखवले जाते.

हेही वाचा – ‘२०२४ च्या आधी भाजपा फुटलेली असेल’; ठाकरे गटातील नेत्यांचा दावा

शारदा आणि गणपती या दोन्ही देवता बुद्धीच्या प्रतीक मानल्या जातात यामुळे देखील या दोन्ही देवतांना एकत्र दाखवण्याची पद्धत आहे. अशा मूर्तींमध्ये अथवा चित्रांमध्ये शारदा ही गणेशाची पत्नी असावी अशी कल्पना केलेली आढळते. मात्र अशा मूर्तींना कुठलाही मूर्तिशास्त्रीय आधार नसून भक्तांच्या कल्पना शक्तीचा तो आविष्कारच समजावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button