breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘धर्मवीर २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर

मुंबई : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर हा चित्रपट आधारित होता. आनंद दिघे यांचा संपुर्ण प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. दरम्यान आता लवकरच धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. जेजुरीमधील खंडोबाचं दर्शन घेतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये मंगेश देसाई, प्रवीन तरडे हे दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पोस्टर दिसत आहे. लवकरच धर्मवीर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – भाजपा महाविजय अभियान २०२४ साठी पिंपरी विधानसभा सज्ज 

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग १ च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग २ ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे २, असं मंगेश देसाई यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button