breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा मृत्यू

पुणे : कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळचा अखेर मृत्य झाला आहे. त्याला वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

शरद मोहोळवर नेमका गोळीबार कोणी केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, तीन ते चार हल्लेखोरांना अगदी जवळून शरद मोहोळवर गोळीबार केला होता, गोळ्या अगदी जवळून झाल्याने मोहोळ अंत्यत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे शरद मोहोळविरूध्द दाखल होते. काही गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका देखील झाली होती.गेल्या अनेक दिवसांपासुन शरद मोहोळ सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाला होता. राजकारणात येण्याची त्याची इच्छा देखील होती, असे त्याचे निकटवर्तीय सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button