ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सेवा विकास बँकेत पैसे काढण्यासाठी खातेधारकांची गर्दी

पिंपरी चिंचवड | बोगस कर्ज वाटप प्रकरणी अडचणीत सापडलेल्या सेवा विकास बँकेत पैसे काढण्यासाठी आज (शनिवार, दि.21) खातेधारकांनी मोठी गर्दी केली. सेवा विकास बँकेत बोगस कर्जवाटपात 429.57 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या खातेधारकांनी पैसे घेण्यासाठी पिंपरीतील मुख्य शाखा व पिंपरी वाघेरे येथील शाखेत गर्दी केल्याचे दिसून आले.सेवा विकास बँकेत बोगस कर्जवाटपात 429.57 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. सहकार विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे बँकेच्या खातेदार व ठेवीदार यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बँकेने खातेधारकांना पैसे देण्यास सुरूवात केली असून, आपले पैसे काढून घेण्यासाठी शाखेत खातेधारकांनी एकच गर्दी केली.

पैसे घेण्यासाठी आलेल्या खातेधारकांना विचारले असता ते म्हणाले, ‘बँक सध्या प्रत्येक खातेधारकाला दहा हजार रूपये देत आहे. आम्ही आमचे पैसे काढून घेण्यासाठी शाखेत आलो आहोत. अधिक पैसे असलेल्या खातेधारकांना पुढील आठवड्यात पैसे दिले जाणार असल्याचे त्याठिकाणी आलेले खातेधारक म्हणाले.’सेवा विकास बँक पिंपरी मुख्यशाखेच्या व्यवस्थापक सिमा शर्मा म्हणाल्या, ‘जसे पैसे येत आहेत त्याप्रमाणे पैश्यांचे वाटप सुरू आहे. कुणालाही पैसे नाकारले जात नाहीत, तसेच एटीएम ब्लॉक केलेले नाही व आरबीआयने देखील कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे कालपासून शाखेत गर्दी होत आहे. सेवा विकास बँकेच्या एकूण 25 शाखा असून सुमारे एक लाख खातेदार आहेत. बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून खातेदारांनी घाबरून जायचे कारण नाही.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button