breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे, जलस्त्रोताच्या बाजुला राडारोडा टाकणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार – आयुक्त राजेश पाटील

  • पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात नियमबाहय राडारोडा टाकणा-यांकडून मनपा दहा पट दंड वसूल करणार

पिंपरी | प्रतिनिधी 
पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्माण होणा-या राडारोडयासंबंधी मनपाच्या यंत्रणाशी संपर्क न करता अनाध‍िकृत कोणीही नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे इत्यादी जलस्त्रोताच्या बाजुने किंवा रस्ता, पदपथ किंवा मोकळया खाजगी, शासकीय जागेवर राडारोडा टाकल्याचे आढळल्यास संबंधितांवर राडारोडयाच्या प्रमाणात वाहतुकीसाठी व प्रक्रीयासाठी येणा-या खर्चाच्या १० पट रक्कम दंड म्हणून वसुल करण्यात येईल. तसेच, त्यांच्यावर महानगरपालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना किंवा शासकीय संस्थाची विकास कामे करताना निर्माण होणारा बांधकाम राडारोडा (Contraction & Demolition Management Rule 2016) च्या अध‍िनियमानुसार विल्हेवाट लावणेबाबत अंमलबजावणी करण्याच्या धोरणास मा. महापालिका सभा ठराव क्रमांक ४६९, दि. २०/११/२०१९ अन्वये मान्यता मिळाली असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, विविध बांधकाम संस्था, खासगी व शासकीय कामाचे ठेकेदार यांनी याबाबत अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. शहरात निर्माण होणारा बांधकाम राडारोडा नियमानुसार गोळा करून वाहतुक करणेसाठी, तसेच सदरच्या राडारोडयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करणेसाठी मनपाने मे. एस.एस.एन.एनव्हेटीव्ह इन्फ्रा. एल.एल.पी. यांची नेमणुक केलेली असून बांधकाम राडारोडाच्या कचरा निर्माण करणा-यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

शहरात (C & D Waste Generate) करणा-या सर्वांनी इतरत्र कोठेही राडारोडा न टाकता मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक १८००१२०३३२१२६ यावर संपर्क करून राडारोडयाविषयी माहीती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर सदरचा राडारोडा उचलण्याची व्यवस्था करण्यात येईल. बांधकाम राडारोडयामध्ये कॉक्रीट, माती, स्टील, लाकुड, विटा आण‍ि रेती मधील सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिक्स करू नये. कचरा गोळा करून त्याची वाहतुकीसाठी मनपाने नियुक्त केलेल्या कंपनीस कळविणे अथवा स्वत:चे वाहनाने मोशी येथील प्लँटवर आणुन टाकता येईल. त्याचबरोबर, मनपाने प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात बांधकाम राडारोडा टाकणेसाठी जागा निश्च‍ित केली असून त्याचठिकाणी राडारोडा टाकावा. तसेच, शहरातील खाजगी, शासकीय, निमशासकीय, ठेकेदाराकडून (Bulk Generator) निर्माण होणा-या बांधकाम राडारोडयाच्या अंदाजे प्रमाण व ठिकाण मनपाकडे नोंदणी केल्यानंतर आवश्यक क्षमतेच्या कंटेनरची सोय करण्यात येईल. शहरातील सर्व खाजगी, शासकीय, निमशासकीय कंत्राटद्वारे बांधकाम चालु करणेपुर्वी मनपाची किंवा इतर सक्षम प्राध‍िकरणाची परवानगी घेताना मनपाकडे (C & D Waste) साठी (Registration) करून राडारोडयाच्या प्रमाणात निश्च‍ित केलेल्या दरानुसार २५ टक्के आगाऊ रक्कम जमा करावी. मनपा परिसरात बांधकाम राडारोडा निर्मितीदारांकडून व त्यावर प्रक्रीयेकामी बांधकाम राडारोडा उचलणे व मोशी राडारोडा प्रक्रीया केंद्रापर्यंत प्रतिटन प्रति किमी १५ रुपये वहन खर्च तसेच बांधकाम राडारोडा प्रक्रीया शुल्क प्रतिटन २५०रुपये आकारण्यात येणार असल्याचेही आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी सांगितले.

राडारोडयापासून पुर्ननिर्मीती घटकांच्या वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे…

जमा होणा-या राडारोडयावर प्रक्रीया करून निर्माण झालेले बांधकाम साहित्य मनपासाठी व शहरासाठी खाजगी, शासकीय व्यवसायिकांना बाजारभावापेक्षा २० टक्के दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. मनपाच्या विकास कामामध्ये राडारोडयापासून निर्माण झालेल्या बांधकाम साहित्याचा (Structural Member) उदा. GBS, Wes Mix, पेव्हर ब्लॉक, कर्व्ह स्टोन, चेंबर कव्हर, दगड, वाळु, विटा इत्यादीचा वापर कमीत कमी २० टक्के करणे बंधनकारक राहील. उपरोक्तप्रमाणे जाहीर सुचना प्रसिध्द झाल्यापासून शहरात निर्माण होणा-या बांधकाम राडारोडा, व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत मा. महापालिका सभेने मंजूर केलेले धोरणाची अंमलबजावणी शहरातील सर्व निर्मीतीदारांवर बंधनकारक करणेत आल्याचेही आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button