breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

मुंबई |

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टि्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतातली कोविशिल्ड ही लस उत्पादन करते.

वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत ११ सुरक्षा अधिकारी असतात. अदर यांना देशभरात ही सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भातले आदेश दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. दरम्यान, अदर यांनी आजच त्यांच्या संस्थेकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लशीची नवी किंमत जाहीर केली.सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत आता १०० रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. आता ती ३०० रुपयांना मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी आजच ही माहिती दिली आहे.

वाचा- #Covid-19: महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं जाहीर!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button