breaking-newsपुणे

#Coronolockdown:स्पर्धा परीक्षांसाठी दिल्लीत गेलेले 850 विद्यार्थी अडकले, राज्यात परतण्यासाठी धडपड

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे राजधानीतच अडकले आहेत. जवळपास साडेआठशेहून अधिक विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात परतण्यासाठी धडपड सुरु आहे.

कोटामधील विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही घरी न्यावं, ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हे विद्यार्थी दिल्लीत गेले आहेत. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे साडेआठशेहून अधिक विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत.

या विद्यार्थ्यांनी अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क साधला, परंतु अजूनही घरी येण्याची व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. काही विद्यार्थी राहत असलेल्या भागात कोरोना रुग्ण आढळले असल्याने विद्यार्थ्यांची आणि परिणामी राज्यात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचीही धाकधूक वाढली आहे. कोटामधील विद्यार्थ्यांची सुटका होत असल्याचं पाहून त्यांनीही राज्य सरकारकडे साकडं घातलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button