breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: स्थलांतर बंदीचा ट्रम्प यांचा विचार

करोना साथीत आधीच अनेकांचे रोजगार गेले असून अमेरिकी लोकांचे उरलेसुरले रोजगार वाचवण्यासाठी आपण तात्पुरत्या स्थलांतर बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचा अर्थ यापुढे परदेशातील लोकांना अमेरिकेत येऊ न देण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक सिनेटर कमला हॅरीस यांनी स्थलांतर बंदीच्या प्रस्तावास विरोध केला आहे.

करोनाने अमेरिकेत ४२,०९४ बळी गेले असून तेथे साडेसात लाख लोकांना संसर्ग झाला आहे. ट्रम्प हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार असणार आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, करोना विषाणूच्या अदृश्य शत्रूशी आपण लढत आहोत पण हे करीत असताना अमेरिकी लोकांचे उरलेसुरले रोजगार तरी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण अमेरिकेत स्थलांतर बंदी आदेश तात्पुरता लागू करण्याच्या अध्यक्षीय आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत. त्यामुळे परदेशातून कुणालाही अमेरिकेत येता येणार नाही.

दरम्यान, ट्रम्प यांचा हा आदेश नेमका कुठल्या स्वरूपाचा असणार आहे हे समजलेले नाही. या आदेशावर नेमकी केव्हा स्वाक्षरी करणार हे त्यांनी सांगितलेले नाही.

एनबीसी न्यूजने म्हटले आहे, की स्थलांतर बंदीचा हा प्रस्ताव काही दिवसांपासून विचाराधीन होता. त्याचा फटका किती देशांना बसेल हे कळलेले नाही. करोना साथ सुरू झाल्यानंतर अमेरिकेने चीन, युरोप, कॅनडा व मेक्सिकोतून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली असून व्हिसा सेवा बंद केली आहे.

डेमोक्रॅट सदस्य जोआकिन कॅस्ट्रो यांनी सांगितले, की करोनाचा पेच हाताळण्यात आलेले अपयश लपवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. एकाधिकारशाही वापरून ते स्थलांतरबंदी करू पाहत आहेत.

परिस्थितीचा फायदा घेऊन अध्यक्ष ट्रम्प हे स्थलांतर धोरण अधिक कडक करू पाहत आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून करोनाच्या धोक्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. त्यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाळल्याने अनेक लोकांचे जीव गेले. आता ते निर्लज्जपणे करोना साथीचे राजकारण करून स्थलांतर विरोधी मोहीम राबवत आहेत.

– कमला हॅरीस, डेमोक्रॅटिक सिनेटर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button