breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: रक्तद्रव वैद्यकीय चाचण्यांना मान्यता
केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या रक्तद्रव (प्लाझ्मा) वैद्यकीय चाचणीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. गंभीर अवस्थेतील करोना रुग्णांना बरे करण्यासाठी रक्तद्रवाचा वापर करता येतो. त्यात बऱ्या झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव चौदा दिवसांनीही चाचणी नकारात्मक आल्यानंतर घेऊन तो गंभीर करोना रुग्णाला टोचला जातो. त्यात रक्तगट जुळणे गरजेचे असते.