breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

#CoronaVirus: मुंबईनंतर आता दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारहून अधिक नवे रुग्ण

दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारहून अधिक नवे रुग्ण आढळले. गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत १,०२४ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या आता १६,२८१ झाली आहे. मृत्यूचा आकडाही ३१६ झाला असून चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील १३ शहरांमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. त्यातही मुंबईत सर्वात जास्त ३६ हजार रुग्ण असून आता दिल्ली दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. शहरात रुग्णवाढीचा दर ४.८९ टक्के (प्रतिदिन वाढ) असून देशाची सरासरी ५.०२ टक्के आहे. देशाच्या तुलनेत दिल्लीत रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर ५.४४ टक्के आहे. बिहार, आसाम, केरळ या राज्यांमध्येही देशाच्या सरासरीपेक्षा रुग्णवाढीचा दर अधिक आहे.

राज्यांमधील रुग्णांची संख्या

महाराष्ट्र (५९,५४६), तमिळनाडू (१९,३७२), दिल्ली (१६,३७२), गुजरात (१५,५७२), राजस्थान (७,९५४), मध्य प्रदेश (७,४५३)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button