breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण, २६ मृत्यू, संख्या ११ हजार ५०० च्याही वर
महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. आज १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत १८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.