breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यटेक -तंत्रताज्या घडामोडी

#CoronaVirus: भारतीय अमेरिकी जोडप्याकडून कमी खर्चात व्हेंटिलेटर निर्मिती

भारतीय अमेरिकी जोडप्याने कमी खर्चातील आपत्कालीन व्हेंटिलेटर तयार केला असून तो लवकरच उत्पादनाच्या टप्प्यात येत आहे. तो भारतातही उपलब्ध होणार असून कोविड १९ रुग्णांवरील उपचारात त्यामुळे मदत होणार आहे. करोना साथीच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता असताना जॉर्जिया टेकच्या जॉर्ज डब्ल्यू व्रुडफ स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्रा. देवेश रंजन व अ‍ॅटलांटात डॉक्टर असलेली त्यांची पत्नी कुमुदा रंजन यांनी हा व्हेंटिलेटर विकसित केला आहे.  तीन आठवडय़ात त्यांनी त्याची निर्मिती केली आहे. जर त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले तर त्याची उत्पादन किंमत १०० डॉलर्स राहील. त्यामुळे अगदी पाचशे डॉलर्सला विकूनही त्यात पुरेसा पैसा कमावूनही आरोग्यसेवा करता येऊ शकते.  या व्हेंटिलेटरची सध्या अमेरिकेतील किंमत १० हजार डॉलर्स आहे, त्यामुळे तो पाचशे डॉलर्समध्ये मिळणार असेल तर ती मोठीच गोष्ट आहे. या व्हेंटिलेटरच्या मदतीने  शरीराची सर्व श्वसन प्रक्रियाच ताब्यात घेतली जाते, पण असे फुफ्फुसे काम करीत नसतील तरच केले जाते. व्हेंटिलेटरमुळे शरीराला संसर्गातून बाहेर पडण्यास वेळ मिळतो. अर्थात हा जो व्हेंटिलेटर आहे तो आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभागात वापरतात तेवढा आधुनिक व्हेटिंलेटर नाही. हा ओपन एअरव्हेन्ट जीटी व्हेंटिलेटर असून तीव्र श्वास विकारात त्याचा वापर करतात. कोविड १९ आजारात फुप्फुसांची लवचिकता कमी होतो. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज असते. जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने हा व्हेंटिलेटर तयार केला असून त्यात इलेक्ट्रॉनिक संवेदक व संगणक नियंत्रण आहे. कमी खर्चात व्हेंटिलेटर तयार करणे हा या प्रकल्पाचा हेतू असल्याचे कुमुदा यांनी म्हटले आहे. रंजन यांचा जन्म बिहारमधील पाटण्याचा असून त्यांनी त्रिची येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली, नंतर विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातून पीएचडी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button