breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: प्रतिबंधित क्षेत्रातील ७० हजार घरात पालिका रेशन वाटप करणार
पुणे शहरातील मध्य भागात करोना विषाणूंचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून तो भाग सील करण्यात आला आहे. यामुळे तेथील नागरिकांना बाहेर पडता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित भागातील तब्बल ७० हजार घरामध्ये उद्यापासून रेशनिंगचे वाटप केले जाणार आहे. प्रशासनामार्फत याबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.