breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात ११ वर्षीय मुलासह तीन जणांचा कोरोनामुळं मृत्यू
पुणे जिल्ह्यात आज करोनाच्या संसर्गाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ११ वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. यामुळे पुणे विभागातील मृतांचा आकडा ११८वर पोहोचला. तर करोनाबाधितांची एकूण संख्या २,१३१वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.