breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दररोज १,५०० कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीचे लक्ष्य – विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर
पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात येत असून सध्याच्या स्थितीत सहाशे ते साडेसहाशे करोनाग्रस्त रुग्णांच्या चाचण्या होत आहेत. येत्या आठवड्याभरात हेच प्रमाण १,५०० वर नेण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली.