breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात ७२ नवे रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ामध्ये गुरुवारी दिवसभरात ७२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांचा आकडा ९३९ इतका झाला आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून या दोन्ही शहरात अनुक्रमे ३१ आणि २४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच ठाण्यात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार ठाणे ३१, कल्याण-डोंबिवली ६, भिवंडी १, अंबरनाथ १, बदलापूर ४, मिरा-भाईंदर ५, नवी मुंबई २४ असे ७२ नवे रुग्ण आढळले आहेत.