breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus | कोल्हापुरात आज 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील चौघेजण एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाला हादरा बसला आहे. कोल्हापूर जिल्हा आता रेड झोनमध्ये असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

शाहूवाडी तालुक्यातील 33 वर्षीय गरोदर महिला आणि जयसिंगपूर येथील वीस वर्षाच्या युवकाला कोरोणा झाल्याचं स्पष्ट झालं. तर अवघ्या तासाभरात मुंबईहून रात्री उशिरा कोल्हापूरात आलेल्या राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे गावातील 36 वर्षीय व्यक्ती आणि त्याची अकरा वर्षाची मुलगी यांचाही रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. या सर्वांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 28 पॉझिटिव रुग्णांपैकी दहा रुग्णांनी कोरोणावर मात करत डिस्चार्ज घेतला आहे तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button