breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना विषाणूची ‘ही’ 6 नविन लक्षणे

कोरोना विषाणूची लागण झाल्यावर सर्दी, ताप, खोकला, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे या सारखी लक्षणं असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र यात मोठे आव्हान म्हणजे अनेक लोकांना अशी लक्षणं दिसून येतच नाही. अनेकांना कोरोना झालाय पण त्यांना हा त्रास होत नाही. अशामध्ये अमेरिकेत कोरोनाची आणखी सहा नवीन लक्षणं दिसून आली आहेत. 

अमेरिकेतील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य संस्था असलेल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशनने (सीडीसी) कोरोनाची ही सहा नवीन लक्षणं शोधून काढली आहेत. सीडीसीने सांगितले की, सर्दी, थंडीमुळे शरीराचा थरकाप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि चव किंवा गंध ओळखण्याची शक्ती कमी होणे ही कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन लक्षणे असू शकतात. या आरोग्य संघटनेने हे देखील स्पष्ट केले आहे की नाकातून सतत पाणी येणे हे एखाद्या संक्रमित व्यक्तीमध्ये क्वचितच आढळते आणि शिंका येणे हे कोरोना विषाणूचे लक्षण नाही. 

सीडीसीने आधी सांगितले होते की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणं आढळून येत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button