breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 65 वर
अमरावती | शहरातील खोलापूरी गेट परिसरातील एका 70 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. तर जुन्या कॉटन मार्केट परिसरातील 61 वर्षीय पुरुषाला सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे काल सकाळी ग्रामीण भागातील शिराळा येथे एका पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज पुन्हा शिराळा येथील 45 वर्षीय पुरुष, व 23 वर्षीय पुरुष या दोन पुरुषांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चार पॉझिटिव्ह अहवालांपैकी एक पॉझिटिव्ह अहवाल शहरातील राजकीय नेता असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे आता प्रशासनाकडे सुद्धा मोठी जबाबदारी आलेली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही 65 झाली असून यातील 10 रुग्णांचा मुत्यू झालेला आहे.