breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाखांवर तर 22.47 लाख कोरोनामुक्त

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 54 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 97897 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,401,612 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 343,804 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 2,247,151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 131,423 रुग्ण आहेत. तर 3,868 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 73,170  अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 54,385 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,666,828 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 98,683 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,675 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 257,154  इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 347,398 कोरोनाबाधित आहेत तर 22013 लोकांचा मृत्यू झालाय.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 28,678 लोकांचा मृत्यू झालाय. 282,370 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,735 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 229,327 इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button