breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Corona Virus: कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा

बँकॉक | महाईन्यूज

थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवार एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झालेला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलेलं आहे.

डॉक्टर क्रिएंगसक यांनी सांगितलं की, ‘उपचारानंतर 48 तासांनी झालेल्या लॅब टेस्टमध्ये महिलेच्या शरीरात करोना विषाणू आढळून आलेले नाहीत. तसेच उपचारानंतर 12 तासांनी महिला अगदी चालू फिरूही लागली. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, ‘कोरोनाच्या रूग्णावर उपचारासाठी अॅन्टी-फ्लू आणि अॅन्टी-एचआय औषधांचा वापर केला गेला आहे. हे औषध तयार करण्यासाठी ओस्टेल्टामिविर, लोपिनवीर आणि रटनवीर औषधांचा वापर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button