breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कमर्शियल गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महागला

नवी दिल्ली – पोटनिवडणुकांच्या निकालानंतर कमी केलेले आणि तेव्हापासून स्थिर असलेले इंधन दर. यामुळे गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची अपेक्षा असलेल्या नागरिकांना आज गॅस सिलिंडर दरवाढीचा झटका बसला. ही गॅस सिलिंडर दरवाढ १९ किलोच्या व्यवसायिक सिलिंडरची आहे. आजच्या दरवाढीमुळे कमर्शियल गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महागला आहे.

पोटनिवडणुकांचा निकाल आणि उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुका. यामुळे पेट्रोल-डिझेलसारखी गॅस सिलिंडर दरातही कपात होईल, अशी अपेक्षा सामान्यांना होती. मात्र आजपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हा गॅस सिलिंडर २६६ रुपयांनी महागला होता. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या दरवाढीमुळे आज दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलिंडर २,१०१ रुपये झाला आहे. २ महिन्यांपूर्वी तो १,७३३ रुपयांना होता. मुंबईतही १९ किलोचा व्यवसायिक गॅस सिलिंडर २,०५१ रुपये झाला आहे. तर १९ किलोचा इंडेन गॅस सिलिंडर २,१७४ रुपये ५० पैसे झाला आहे. चेन्नईत हा गॅस सिलिंडर २,२३४ रुपये झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button