breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकाना रविवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना ‘या’ केंद्रांवर लस मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. पहिला 150 आणि दुसरा डोस 150 च्या क्षमतेने देण्यात येणार आहे. कोविन ॲपद्वारे बुकिंग केलेल्या 130 आणि किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 20 लाभार्थ्यांचे या केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

कोविन ॲपद्वारे नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पहिला डोस ‘या’ केंद्रावर मिळणार !

साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, संजय काळे सभागृह, घरकुल दवाखाना चिखली, भानसे स्कुल यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव,गणेश इंग्लिश स्कुल दापोडी,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या 28 केंद्रांवर कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या 100 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!

हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर,महापालिका शाळा जाधववाडी, महापालिका कन्या शाळा चिखली, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, रुपीनगर ठाकरे शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, गंगोत्री पार्क दिघी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड,गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

कोविन ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग केलेल्या 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर आणि अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय आणि जुने जिजामाता रुग्णालय येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस !

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button