breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत CISF जवानाची आत्महत्या, एके ४७ ने स्वतःवर गोळी झाडली

मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या जिओ गार्डनजवळ भीषण अपघात झाला आहे. येथे एका CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश खेतरिया असे या हवालदाराचे नाव असून तो गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे.मुकेशने सोबत ठेवलेल्या एके ४७ रायफलने स्वतःवर गोळी झाडली. सूत्रांनी सांगितले की, मुकेशची ड्युटी जिओ गार्डनच्या गेट क्रमांक ५ वर होती. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आणि त्यानंतर हवालदाराने स्वत:वर गोळी झाडल्याचे लोकांनी पाहिले.

 हेही वाचा – ‘पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने परिस्थितीचा आढावा घेतला आणि घटनास्थळी उपस्थित पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशला तात्काळ सायन रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी सीआयएसएफ जवानाला मृत घोषित केले.पोलिसांना घटनास्थळावरून जवानाची एके ४७ आणि जिवंत गोळ्यांच्या २९ राउंड सापडल्या आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती मुकेशचे वडील खोडाभाई यांना दिली आहे. बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button