TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे संशोधन उपक्रमांना चालना देणारे : डॉ. मनोहर चासकर

पिंपरी | ३ नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अल्प खर्चात पोहोचले पाहिजे. त्याचा प्रत्यक्ष लाभ त्या नागरिकांना झाला पाहिजे. तरच देश समृद्ध होईल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी केले. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे “नवधारा” सारख्या संशोधन उपक्रमांना चालना व पाठबळ देणारे आहे. त्यामुळे आगामी काळात अशा उपक्रमांना विद्यापीठ नेहमी पाठबळ देईल अशी ग्वाही डॉ. चासकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे “नवोधारा २०२२” या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. चासकर बोलत होते. यावेळी कॅप जेमिनी इंडियाचे संचालक गिरीश बोरा, उद्योजक नरेंद्र लांडगे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीच्या डॉ. जान्हवी इनामदार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्रा. तुषार गायकवाड, प्रा. मनीषा देशपांडे, प्रा. प्रिया ओघे आदी उपस्थित होते.
गिरीश बोरा म्हणाले की, अभियांत्रिकी विद्यालयाच्या पातळीवर होणारे संशोधन हे उद्योग जगतापर्यंत पोहोचणे आणि त्याची पेटंट नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, या महाविद्यालयात नव संशोधन, उत्पादन निर्मिती, स्टार्टअप यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरित केला जाते. पेटंट आणि कॉपीराईट मध्ये पीसीसीओईआर अग्रेसर आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्णता आणि सर्जनशीलतेचा परिचय होईल. तांत्रिक शिक्षण आत्मसात करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, सर्जनशीलता व कौशल्य विकसित होईल. याची सुरुवात प्रथम वर्षापासूनच व्हावी या उद्देशाने प्रोजेक्ट बेस लर्निंग हा स्तुत्य उपक्रम घेऊन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, शिरपूर मुंबई, संगमनेर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातून मेकॅनिकल, सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या शाखांमधील प्रोजेक्ट आणि पोस्टर्स घेऊन संघ सहभागी झाले आहेत.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा विस्तृत निकाल पुढील प्रमाणे : कॉम्प्युटर विभागात : प्रथम क्रमांक :- ताडोमल शहाणी इंजिनियर कॉलेज, मुंबई, बांद्रा; द्वितीय क्रमांक :- पीसीसीओईआर, रावेत, पुणे; तृतीय क्रमांक :- अमृतवाही कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रथम क्रमांक :- पीसीसीओईआर रावेत, पुणे; द्वितीय क्रमांक :- डीकेटीई, इचलकरंजी; तृतीय क्रमांक :- एचएसबीपीवीटी कास्टी, अहमदनगर आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. पुणे;
मेकॅनिकल विभागात :- प्रथम क्रमांक पीसीसीओईआर रावेत, पुणे; द्वितीय क्रमांक :- गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अवसरी, पुणे; तृतीय क्रमांक :- कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे;
सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक :- सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव, पुणे; द्वितीय क्रमांक :- मोझे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे; तृतीय क्रमांक :- भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वाघोली, पुणे.
या संघांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्वागत प्रा. तुषार गायकवाड, सूत्रसंचालन प्रा. प्रिया ओघे आणि आभार प्रा. मनीषा देशपांडे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button