breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुशखबर! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती!

Maharashtra Talathi Bharti 2023 : गेल्या अनके दिवसांपासून लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल ४ हजार ६२५ जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत.

१७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील ४ हजार ६२५ विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळणार आहे.

हेही वाचा – Monsoon Update : राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

या आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.

तलाठी भरती प्रारूप जाहिरात प्रकशित ! – Talathi Bharti 2023
https://mahabharti.in/talathi-bharti-2023/

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button