‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी
![‘Withdraw more than 4 times…’; Important news for State Bank account holders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/sbi.jpg)
नवी दिल्ली – एसबीआय बॅंकेच्या खातेदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 1 जुलैपासून एक नवा नियम लागू होणार आहे. आता महिन्यात चार विनामूल्य कॅश विड्रॉलनंतर बचत बँक ठेवी खातेधारकांकडून शुल्क आकारलं जाणार आहे.
एका वर्षामध्ये 10 पानांपेक्षा अधिक पानी चेक बुकसाठी शुल्क आकारलं जाईल. तसेच बीएसबीडी खात्यातील सेवा शुल्कामध्ये बदल केल्यानुसार 1 जुलैपासून या कामांसाठी बँक 15 ते 75 रुपये आकारेल. चेक बुकच्या 10 पानांसाठी 40 रुपये शुल्क व 25 पानांसाठी 75 रुपये शुल्क आकारलं जाईल. यासाठी जीएसटी वेगळा जोडला जाईल.
बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखांमध्ये, एटीएममध्ये, सीडीएममध्ये विना-आर्थिक व्यवहार आणि हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील. अतिरिक्त जीएसटी असलेल्या शाखा, एसबीआय एटीएम किंवा इतर बँक एटीएममधून चार मोफत कॅश विथड्रॉलपेक्षा जास्त व्यवहारावर ते प्रति विथड्रॉलवर 15 रुपये शुल्क आकारेल, असं एसबीआयने म्हटलं आहे.
एटीएम आणि शाखेतून चार मोफत कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारलं जाईल, असं असं एसबीआयने सांगितलं आहे. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना चेकबुक सेवांवर सूट देण्यात आली आहे, असंही बँकेने सांगितलंय.