Uber वर कोरोना व्हायरसचं सावट, कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/uber-seva.jpg)
मुंबई | आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबरवर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल. जगभरात लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट आणि कॅब सर्व्हिसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यूएस सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज कमीशन (एसईसी) ने उबेर द्वारा घोषित केलेलल्या वक्तव्यामध्ये म्हटलंय की,’कोरोना व्हायरस या महामारीमुळे उत्पन्नात खूप अनिश्चितता आली असून याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. यामुळे कंपनीने काही खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.’
उबरने म्हटलं आहे की, राइड्स सेगमेंटमध्ये कमी ट्रिप वॉल्यूम आणि हायरिंग फ्रीजमुळे उबर आपल्या कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीमला कमी करणार आहे. कंपनीने आपल्या कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीमला कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता कंपनीने ३ हजार ७०० फूल टाइम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.