टाटा समुहाचा विक्रम, ५ दिवसात कमावले २० हजार कोटी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-24-780x470.jpg)
Tata Group : देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या भाग भांडवलात गेल्या आठवड्यात ६५३०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये टीसीएसला (TCS) सर्वाधिक फायदा झाला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात ६५,३०२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सुरुवातीला TCS चे मार्केट कॅप 15 लाख कोटींच्या वर गेले होते. नंतर शेअर्समध्ये थोडी घसरण झालीय. सध्या TCS चे मार्केट कॅप अजूनही १५ लाख कोटी रुपयांच्या खाली आहे. दरम्यान, मागील ५ दिवसात टाटा समुहानं २० हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
टाटा कंपन्यांनी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेष बाब म्हणजे देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच TCS चे मार्केट कॅप १५ लाख कोटींच्या वर गेले होते. नंतर शेअर घसरला. सध्या TCS चे मार्केट कॅप अजूनही १५ लाख कोटी रुपयांच्या खाली आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत TCS चे शेअर्स आणखी वाढू शकतात. दुसरीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला तोटा सहन करावा लागला. तर देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा – ‘सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा’; संजय राऊत
गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील टॉप 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मार्केट कॅप एकत्रितपणे ६५,३०२.५ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि ICICI बँक यांचा सर्वाधिक फायदा झाला. दुसरीकडे, रिलायन्स आणि एलआयसीसह तीन कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ३२६०० कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. एलआयसी आणि नंतर इन्फोसिसला सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ६६३.३५ अंकांनी किंवा ०.९० टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६५.७ अंकांनी किंवा ०.७४ टक्क्यांनी वाढला. बीएसई आणि एनएसईने शनिवारी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले होते, ज्यामुळं प्राथमिक साइटवर मोठ्या व्यत्यय किंवा अपयशाला सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी तपासली गेली होती.