breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

SBI ने बचतीवर चालवली कात्री, कोट्यवधी ग्राहकांना बसणार झटका

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांच्या बचतीवर कात्री चालवली आहे. एसबीआयने मुदत ठेवीचे (एफडी) व्याज दर घटवले आहेत. हे नवीन दर १० जानेवारीपासून लागू झाले आहेत. बँकेने एक ते १० वर्षांचे एफडी दर १५ बेसिस पाँईंटने घटवले आहेत. तर ७ दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतच्या एफडीतील व्याजदरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत.

यापूर्वी बँकेने एक वर्षांपेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या एफडीच्या व्याजदरात १५ बेसिस पाँईंटची कपात केली होती.

१. ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवरील व्याज दर- ४.५० टक्के
२. ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवर व्याज दर- ५.५० टक्के
३. १८० दिवस ते २१० दिवस आणि २११ दिवस आणि १ वर्षांहून अधिक कमीच्या एफडीवर व्याज दर- ५.८० टक्के.
४. एक वर्ष ते १० वर्षांच्या कालावधीत व्याजदर ६.२५ टक्क्यांवरुन कमी होत ६.१० टक्के करण्यात आले आहे. एसबीआयने या एफडीवरील व्याज दर घटवले आहेत.
५. एक वर्ष ते २ वर्षांहून कमी, २ वर्ष आणि ३ वर्षांहून कमी, ३ वर्ष आणि ५ वर्षांहून कमी, ५ ते १० वर्षांच्या एफडीवर व्याज दर ६.१० टक्के आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button