breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

आता सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार

मुंबई – आता उद्या रविवार १ ऑगस्टपासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या म्हणजेच एनएसीएलच्या नियमांत बदल केले आहेत. एनएसीएल ही यंत्रणा एनपीसीएलकडून हाताळली जाते. या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या एनएसीएच ही यंत्रणा बँका सुरु असतानाच काम करते. परंतु १ ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहे.

एनएसीएच सेवा १ ऑगस्टपासून २४ तास ७ दिवस कार्य करणार आहे. याचा फायदा नोकरी करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता रविवारीही पगार खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. एनएसीएच सेवा एनपीसीआयद्वारे चालविली जाते. याद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. पगार देणे, भागधारकांना लाभांश देणे, व्याज देणे, पेन्शन हस्तांतरित करणे यांसारखे आणि याशिवाय दर महिन्याला वीज, टेलिफोन, पाण्याची बिले दिली जातात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button