breaking-newsव्यापार

#Lockdown:लॉकडाऊनमध्ये बँकांच्या ठेवीत वाढल्या 139391 कोटी रुपयांनी वाढ

मुंबई : एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात राज्यातील बँकांच्या ठेवी वाढल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. या काळात बँकांच्या ठेवी एक लाख 39 हजार 391 कोटी रुपयांनी वाढल्या आहेत, तर कर्ज 88 हजार 959 कोटी रुपयांनी कमी झाली आहेत.

आपली बचत बँकांमध्ये सुरक्षित राहू शकते, या भावनेने अनेक जणांनी बँकांमध्ये ठेवीच्या स्वरुपात आपली बचत ठेवली आहे. दहा एप्रिल 2020 च्या तुलनेत नऊ मे 2020 रोजी बँकांच्या ठेवी 1,39,391 कोटी रुपयांनी वाढल्या आहेत, तर कर्ज 88,959 कोटी रुपयांनी कमी झाली आहेत.

“जनतेने खर्चात काटकसर केली त्यामुळे बचतीतही वाढ झालेली आहे. या कालावधीत उद्योग, व्यापार, वाणिज्य सगळे काही ठप्प होते. यातील अनेकांनी आपल्या व्यवसायातून काढता पाय घेतला आहे. सरकारचा असा दावा आहे की या कालावधीत अंदाजे सहा लाख कोटी रुपयांची नवीन कर्ज मंजूर करण्यात आली आहेत, पण हा आकडा रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीशी कुठेच मेळ घालत नाही, याचाच अर्थ अर्थव्यवस्था आकुंचित पावत आहे” असा दावा तुळजापूरकर यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button