breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीव्यापार

Jio चा सहा आठवड्यांमध्ये सहावा करार, अबू धाबीची कंपनी गुंतवणार 9,093.60 कोटी रुपये

लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपमध्ये अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. अबू धाबीची ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’ (Mubadala Investment Company)जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती शुक्रवारी रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने (RIL) दिली आहे.

अबू धाबीमधील मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ ओळखली जाते. रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीद्वारे कंपनी जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल.

यासोबतच गेल्या सहा आठवड्यांमधला हा जिओचा सहावा मोठा करार ठरेल. या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 87,655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहितीही रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिली. यापूर्वी  जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये मुबादलाव्यतिरिक्त फेसबुक, सिल्‍वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button