breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

सलग तिसऱ्या महिन्यात GST उत्पन्न १ लाख कोटींहून जास्त

केंद्र सरकारला सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीमधून मोठा महसूल मिळाला आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातील जीएसटी महसूल हा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जीएसटी महसूलाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार सप्टेंबरमध्ये देशात १ लाख १७ हजार १० कोटी रुपये जीएसटी मिळाले. याआधी ऑगस्टमध्ये हाच महसूल १ लाख १२ हजार कोटी इतका होता.

सप्टेंबर महिन्यात सीजीएसटीच्या माध्यमातून २० हजार ५७८ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर एसजीएसटीमध्ये २६ हजार ७६७ कोटी रुपये जमा झाले. याशिवाय आयजीएसटीचे कलेक्शन ६० हजार ९११ कोटी रुपये इतके आहे. यात २९ हजार ५५५ कोटी रुपये हे फक्त गुड्स इम्पोर्टमधील आहेत. सेसच्या माध्यमातूनही केंद्राला ८ हजार ७५४ कोटी रुपये मिळाले आहेत.

जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन हे १.१६ लाख कोटी रुपये इतकं होतं. गेल्या वर्षी याच महिन्यात ८७ हजार ४२२ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. तर जून २०२१ मध्ये जीएसटी कलेक्शन ९२ हजार ८४९ रुपये इतकं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button