Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर आज अचानक घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारताच्या MCX बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १९ हजारांनी उतरून १,४९,०७५ रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो तब्बल ९८ हजारांनी स्वस्त होऊन २,९१,९२२ रुपये झाला आहे. जागतिक सोनं बाजारात शुक्रवारपासून जोरदार नफावसुली सुरू झाली आणि त्यामुळे कालपासून सोन्या-चांदीच्या भावात ही जोरदार घसरण झाली आहे.

सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे अवघड झाले होते. मात्र आजच्या दरघसरणीमुळे गुंतवणूकदारांसह ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे आज चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

सराफा बाजारात सोन्याचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार आज दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम सुमारे ९ हजारांनी स्वस्त झालं आहे. आजचा भाव १,६०,७३० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,३५० रुपये आहे.

हेही वाचा    :        नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी राहणार बंद

चांदीचा भाव

सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीतल्या सराफा बाजारात सलग दोन दिवसांत चांदी ६० हजारांनी स्वस्त झाली असून आज सकाळचा भाव प्रति किलो ३,५०,००० रुपये आहे.

गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना खरेदीपूर्वी अनेकदा विचार करावा लागत होता. मात्र आजचा दिवस सोने-चांदी खरेदीसाठी अनुकूल मानला जात आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर, जीएसटी आणि मेकिंग चार्ज यांमुळे विविध शहरांमध्ये दागिन्यांचे दर वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे अचूक दरांसाठी ग्राहकांनी स्थानिक सराफा व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button