Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

UPI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 10 सेकंदांत पूर्ण होईल ऑनलाइन पेमेंट

NPCI chenged UPI guidelines : युपीआय (UPI) वापरणाऱ्या कोट्यवधी यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय ट्रान्झॅक्शन संदर्भातील काही तांत्रिक बदल करत ट्रान्झॅक्शन व रिव्हर्सल स्टेटससाठीचा रिस्पॉन्स टाइम 30 सेकंदांवरून थेट 10 सेकंदांवर आणला आहे. यामुळे PhonePe, Google Pay, Paytm यांसारखे डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांना पेमेंट कन्फर्मेशनसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

युपीआयमध्ये ट्रान्झॅक्शन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी NPCIने जून 2025 पासून नवे अपडेट लागू केले आहे. याअंतर्गत युपीआय अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) मधील ‘पेमेंट स्टेटस’, ‘रिव्हर्सल स्टेटस’ आणि ‘वॅलिडेट अ‍ॅड्रेस’ यांचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी हे वेळापत्रक 30 ते 15 सेकंद होते, जे आता फक्त 10 सेकंदांमध्ये प्रोसेस होईल.

पूर्वी यूजर्सला पेमेंट झाले की नाही हे समजण्यासाठी 30 सेकंदपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे, पण आता फक्त 10 सेकंदांतच ट्रान्झॅक्शनची स्थिती समजू शकणार आहे. यामुळे ट्रान्झॅक्शनचा अनुभव अधिक वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह होणार आहे.

हेही वाचा –  शिवसेना शिंदे गट ‘या’ बड्या नेत्याच्या नेतृत्वात लढणार मुंबई महापालिकेची निवडणूक

NPCI म्हणजे National Payments Corporation of India (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली संस्था आहे, जी देशातील डिजिटल पेमेंट प्रणालींचे संचालन आणि विकास करते. NPCI चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतात सुरक्षित, सुलभ, वेगवान आणि सर्वांसाठी उपलब्ध असलेली पेमेंट पद्धती उपलब्ध करून देणे. याच संस्थेने UPI (Unified Payments Interface), IMPS (Immediate Payment Service), RuPay कार्ड, AePS (Aadhaar Enabled Payment System) अशा अनेक महत्त्वाच्या सुविधा सुरू केल्या आहेत. NPCI मुळे देशात डिजिटल व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि जलद झाले आहेत.

NPCI ने पुढील धोरण जाहीर केलं

NPCI ने आपल्या निवेदनात सांगितले की, हे बदल युपीआय यंत्रणेत अधिक सुधारणा घडवण्यासाठी करण्यात आले आहेत. ऑगस्ट 2025 पासून सर्व API रिक्वेस्टचे मॉनिटरिंग आणि मॉडरेशन युपीआय सर्व्हिस प्रोव्हायडर्स व बँकांची जबाबदारी असेल.

त्याचप्रमाणे बँक बॅलन्स इन्क्वायरी, अकाउंट लिस्टिंग, ऑटो पेमेंट मँडेट इत्यादी सेवा देखील नवीन प्रणालीच्या अंतर्गत सुधारित करण्यात येणार आहेत.

NPCIने युपीआय प्लॅटफॉर्म अधिक जलद आणि वापरकर्ता-केंद्रित बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, भविष्यात आणखी काही प्रगत सुविधा यामध्ये पाहायला मिळतील, असे संकेत दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button