breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोने गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी, आजचे दर जाणून घ्या!

मुंबई – सोने चांदींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अमेरिककेचा डॉलर मजबूत आणि बॉंन्ड यिल्डमध्ये तेजी आल्याने सोन्याच्या दरांवर दबाव आहे. गुरूवारी मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये MCX सोन्याचे दर 180 रुपये प्रतितोळे घसरले होते. तरी मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारले होते.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचाही सोन्याच्या दरांवर परिणाम होत असतो. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट काही अंशी कमी होत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बाजारातही सकारात्मकता परतेय. या पार्श्वभूमीवर MCXवर सोन्याचा दर 48 हजार 674 रुपयांवर ट्रेंड करीत होता.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर हळुहळु वाढत असताना आज MCXमध्ये सोन्याच्या दरात काहीशी घसरण दिसून आली आहे. परंतु मुंबईतील सोने बाजारात 350 रुपये प्रतितोळे इतकी वाढ झाली आहे. एकंदरीच सोने बाजाराचा ट्रेंड लक्षात घेता. येत्या काही महिन्यात सोने 55 हजार प्रतितोळेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सोन्याचे दर
22 कॅरेट 46 हजार (+350)
24 कॅरेट 47 हजार (+350)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button