आजही इंधन दरवाढ! मुंबईत पेट्रोल 101 रुपयांच्याही पलिकडे
![Fuel price hike for the seventh day in a row in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/petrol-.jpg)
मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड महागाईचा सामना कारावा लागतोय. देशातील जवळपास 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्याही पलिकडे पोहोचले आहेत. त्यातच आजही इंधन दरवाढ झाली असून प्रतिलिटर पेट्रोलचे दर 26-31 महागले असून डिझेलचे दर प्रतिलिटरमागे 26-28 पैशांनी महागले आहेत.
जून महिन्यात आज चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात जवळपास 16 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग 4 दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या धर्तीवर 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात होते. मात्र निवडणुकांचा काळ लोटल्यानंतर इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलचे दर 101 रुपयांवर पोहोचले असून डिझेलचे दर 94 रुपये इतके झाले आहेत.
पेट्रोलचे दर :
मुंबई – 101.52 रुपये प्रतिलिटर
चेन्नई – 96.71 रुपये प्रतिलिटर
दिल्ली – 95.31 रुपये प्रतिलिटर
कोलकाता – 95.28 रुपये प्रतिलिटर
डिझेलचे दर :
मुंबई – 93.58 रुपये प्रतिलिटर
चेन्नई – 90.92 रुपये प्रतिलिटर
दिल्ली – 86.22 रुपये प्रतिलिटर
कोलकाता – 89.07 रुपये प्रतिलिटर