breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

भारतात आणखी आठ बँका येणार, आरबीआयकडे निविदा सादर

नवी दिल्ली – भारतात लवकरच आणखी आठ बँकांचा समावेश होणार आहे. त्यासंदर्भात पात्रता पूर्ण करणारी आठ निवेदने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आली आहेत. त्यानुसार, भारतात सार्वत्रिक सेवा देणाऱ्या ४ बँका, लघु अर्थपुरवठा करणाऱ्या म्हणजेच स्मॉल फायनान्स देणाऱ्या चार बँकेंचे निवेदन आरबीआयकडे आले आहे. यूएई एक्स्चेंज अँड फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड, द रिपॅट्रिएट्स को ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेवलपमेंट बँक लि. (REPCO Bank), चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लि आणि पंकज वैश्य यांनी युनिव्हर्सल बँक लायसन्ससाठी अर्ज केले आहेत.

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी सप्टेंबर 2019 मध्ये चैतन्य प्रा. लिमिटेडमध्ये 739 कोटी रुपये गुंतवून बहुसंख्य शेअर्स खरेदी केले होते. सचिन बंसल हे चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लि. चे मुख्य संचालक आणि CEO आहेत.

लघु अर्थपुरवठा बँकेसाठी अर्ज

लघु अर्थपुरवठा बँकेसाठी चार अर्ज आले आहेत. यामध्ये वीसॉफ्ट टेक्नोलॉजी प्रायव्हेट लि (VSoft Technologies), कालीकट सिटी सर्विस कोऑपरेटिव बँक लि. (Calicut City Service Cooperative Bank), अखिल कुमार गुप्ता (Akhil Kumar Gupta) आणि द्वारा क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायवेट लि. (Dvara Kshetriya Gramin Financial Services) यांचा समावेश आहे.

युनिव्हर्सल बँकेसाठी निकष

नियमावलीनुसार, युनिव्हर्सल बँकेसाठी किमान 500 कोटींचं भांडवल हवं. म्हणजे तुम्हाला जर सार्वत्रिक सेवा देणारी बँक सुरु करायची असेल तर तुमच्याकडे किमान 500 कोटींचं भांडवल असावं.

दुसरीकडे लघु अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांसाठी हीच मर्यादा 200 कोटी रुपये भांडवलाची आहे. जर एखादी नागरी सहकारी बँक स्वेच्छेने स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (SFB) रुपांतरीत होणार असेल तर त्यासाठी 100 कोटी भांडवलाची अट आहे. मात्र 5 वर्षात त्यांना 200 कोटी भांडवलं दाखवावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button