पोस्टात ऑगस्टपासून स्वीकारले जाणार डिजिटल पेमेंट

नवी दिल्ली : पोस्ट कार्यालयातील काउंटरवर ऑगस्ट महिन्यापासून डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार आह.े या सदर्भातील माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम वेगाने पूर्णत्वास जात असून ऑगस्ट पासून पोस्टातील कार्यालयात डिजिटल स्वरूपात पेमेंट स्वीकारले जाणार असल्याचे पोस्ट विभागाच्या सूत्रांनी वृत्तसस्थांना सांगितले.
सध्या पोस्ट कार्यालयातील खाती यूपीआयशी जोडलेली नाहीत. त्यामुळे पोस्ट कार्यालयामध्ये डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नाही. नागरिकांना रोख रक्कम देऊन व्यवहार करावे लागतात. मात्र आता पोस्ट विभागाने आधुनिकीकरणाची मोहीम हाती घेतली असून हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. कर्नाटक राज्यातील पोस्ट कार्यालयात या संदर्भात प्रायोगिक काम चालू असून ते यशस्वी झाले आहे.
हेही वाचा –‘पंढरपूर वारी’चा जागतिक प्रवास सुरू : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक पातळीवर इतर अनेक राज्यांमध्ये हा प्रयोग करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात आगस्टमध्ये संपूर्ण देशातील पोस्ट कार्यालयात डिजिटल पेमेंट स्वीकारू शकतील असे सूत्रांनी नमूद केले.




