breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

#CoronaVirus: विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात

कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात तेल कंपन्यांनी विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. १४.२ किलोच्या विना अनुदानित सिलिंडरचे दर दिल्लीत ६१.५ रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईत हे दर ६२ रुपयांनी कमी झाले आहेत.

दिल्लीत १४.२ किलोचा विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचा दर ७४४ रुपये करण्यात आला आहे. जो पूर्वी ८०५.५० रुपये होता. अशाचप्रकारे कोलकातामध्ये ७४४.५० रुपये, मुंबईत ७१४.५० रुपये आणि चेन्नईत ७६१.५० रुपये झाले आहेत. ज्याचा दर पूर्वी ८३९.५०, ७७६.५० रुपये आणि ८२६ रुपये क्रमशः होता.

इंडियन ऑईल कंपनीच्या वेबसाईटनुसार १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही घट झाली आहे. नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील. दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर ९६ रुपयांनी स्वस्त होईल. पूर्वी याची किंमत १३८१.५० रुपये प्रति सिलिंडर होती. एप्रिलमध्ये याची किंमत १२८५.५० रुपये असेल. याचप्रकारे कोलकातामध्ये याची किंमत घटून १३४८.५० रुपये, मुंबईत १२३४.५० रुपये आणि चेन्नईत १४०२ रुपये झाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button